दिलीप माजगावकर मराठी प्रकाशनक्षेत्रात ‘मशागतीच्या माळीकामा’त रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली

दिलीपरावांचे लेखन, भाषणे, मुलाखती यांच्यातील महत्त्वाचे गुण म्हणजे त्यांची निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता. यातील सातत्य विस्मयचकित करणारे आहे. ही निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता व्यक्तीबद्दल, व्यवसायाबद्दल, साहित्याबद्दल आणि त्यापलीकडे अवघ्या समाजाबद्दल दिसते. दिलीपराव ही व्यक्ती त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे स्वतःला लेखक मानत नसली, तरी त्यांच्या लेखनातून हे चिंतन अल्पाक्षरात आणि म्हणूनच रेखीवपणे प्रकट होत असते.......

मोदींमध्ये काही गुण आहेत, हे त्यांचे विरोधक मान्य करत नाहीत आणि मोदींच्या काही मर्यादा आहेत, असे त्यांचे समर्थक मानत नाहीत. या दोन टोकाच्या दृष्टीकोनांतून वाट काढत हे पुस्तक लिहिले आहे…

नरेंद्र मोदी हा विषय अनेकांसाठी संवेदनशील आहे. गुणांबरोबर दोषांचीही चर्चा व्हावी, मात्र गुणांचे वर्णन करताना भक्तिभाव येऊ नये आणि मर्यादा सांगताना द्वेषभाव असू नये, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. व्यक्तीमधील दोष हे भिंतीसारखे असतात, तर गुण खिडकी-दरवाजासारखे असतात, असे महात्मा गांधी म्हणाल्याचे मी वाचले होते. मी मोदींबाबत गांधीजींचा भिंत-खिडकीचा दृष्टीकोन ठेवला आहे.......